ठाणे : शहरातील कोरोना रुग्णांचा आलेख खाली आला असून आज ४१ नवीन रुग्णांची भर पडली आहे तर १९१जण रोगमुक्त झाले आहेत. सुदैवाने आज नवीन एकाही रुग्णावर रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आली नाही.
महापालिका हद्दीतील माजिवडे-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात सर्वात जास्त १४ रुग्णांची भर पडली आहे तर ११जण उथळसर प्रभाग समितीमध्ये सापडले आहेत. चार रूग्ण वर्तकनगर आणि दोन रूग्ण कळवा प्रभाग समितीमध्ये वाढले आहेत. प्रत्येकी तीन रूग्ण लोकमान्य-सावरकर नगर, नौपाडा-कोपरी प्रभाग समिती आणि वागळे प्रभाग समिती भागात नोंदवले गेले आहेत. सर्वात कमी शून्य रुग्णांची नोंद मुंब्रा आणि दिवा प्रभाग समिती परिसरात झाली आहे तर एका रुग्णाच्या घरचा पत्ता मिळू शकला नाही.
विविध रुग्णालयात आणि घरी उपचार घेत असलेल्या रूग्णांपैकी १९१जण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ८०,३७१ रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर रुग्णालयात आणि घरी ५९२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज एकही रूग्ण दगावला नसून आत्तापर्यंत २,१२४ जणांचा मृत्यू झाला आहे.
महापालिका प्रशासनाने काल शहरातील १०८७ नागरिकांची चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये ४१जण बाधित सापडले आहेत. आत्तापर्यंत २३ लाख ६२,९९० ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ८३,०८७जण बाधित मिळाले आहेत.