ठाणे: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 40 टक्के अपंगत्व व 85 वर्षे वयावरील वृध्द यांच्याकरिता भारत निवडणूक आयोगामार्फत 12 डी नमुना भरुन घरुनच मतदान करता येणार. मात्र ही बाब अनिवार्य नसून अधिकची सुविधा म्हणून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
लोकसभा निवडणूक 2024 ची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे इच्छुक मतदारांनी 12 डी फॉर्म पाच दिवसात भरून द्यायचे आहेत. त्यापैकी पात्र मतदारांना संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देतील.
ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण ८५ वर्षावरील ५९ हजार चार मतदार आहेत. जे मतदार त्यांच्या वृध्दत्व व अंपगत्त्व यामुळे मतदान केंद्रावर येऊन मतदान करू शकत नाही, त्यांच्याकरिता ही सुविधा आहे. पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नयेत, हा यामागील भारत निवडणूक आयोगाचा उद्देश आहे.
भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात पुरुष 1050, महिला 1531, एकूण 2581, शहापूर विधानसभा मतदारसंघात पुरुष 1508, महिला 2003, एकूण 3511,
भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात पुरुष 1162, महिला 1118, एकूण 2280,
भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघात पुरुष 363, महिला 337, एकूण 700, कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात पुरुष=2014, महिला 1623, एकूण 3637,
मुरबाड विधानसभा मतदारसंघात पुरुष 2111, महिला 2285, एकूण 4396, अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात पुरुष 1645, महिला 1398, एकूण 3043,
उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात पुरुष 1037, महिला 1049, एकूण 2086, कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात पुरुष 1066, महिला 964, एकूण 2030, डोंबिवली विधानसभा मतदारसंघात पुरुष 2634, महिला 1,934, एकूण 4568,
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात पुरुष 1575, महिला 1272, एकूण 2847, मीरा-भाईंदर
विधानसभा मतदारसंघात पुरुष 2640, महिला 2410, एकूण 5050,
ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात पुरुष 2164, महिला 1572, एकूण 3736,
कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात पुरुष 1461, महिला 1265, एकूण 2726, ठाणे
विधानसभा मतदारसंघात पुरुष 2817, महिला 2450, एकूण 5267,
मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघात पुरुष 1999, महिला 1620, एकूण 3619, ऐरोली
विधानसभा मतदारसंघात पुरुष 1343, महिला 1134, एकूण 2477,
बेलापूर विधानसभा मतदारसंघात पुरुष 2597, महिला 1853, एकूण 4450 अशा ठाणे जिल्ह्यातील एकूण 18 विधानसभा मतदारसंघात 85 वर्ष व त्याहून अधिक वय असलेल्या पुरुष मतदारांची संख्या 31,186, महिला मतदारांची संख्या 27,819 असे 59004 इतकी आहे, अशी माहिती ठाणे उप जिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी दिली आहे.