पतंगप्रेमींमुळे ५७ पक्षी जखमी

भाईंदर:  मीरा-भाईंदर शहरात मांजामुळे ५७ पक्षी जखमी झाले. यातील दोन पक्ष्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जखमी पक्षांमध्ये प्रामुख्याने कबुतर आणि कावळा हे पक्षी जखमी झाले आहेत. यामध्ये पन्नासहून अधिक कबुतरांचा समावेश आहे.

सहयोग फाऊंडेशन, अहिंसा चॅरिटेबल ट्रस्ट आणि अलर्ट ग्रुपकडून उभारण्यात आलेल्या उपचार केंद्राने माहिती दिली आहे. पक्ष्यांवर उपचार करून सोडून दिले जात असल्याची अहिंसाचे अध्यक्ष कुशल शाह यांनी दिली. बंदी असलेल्या चायनीज मांजा विक्री करणाऱ्या दुकानांवर तुळींज पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये १४ हजार ५०० रुपये किमतीचा मांजा जप्त करून तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ही कारवाई तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर, सहायक पोलीस निरीक्षक (गुन्हे) मिथुन म्हात्रे, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब बांदल व त्यांच्या पथकाने केली आहे.