भाईंदर : वसई-विरार शहर महापालिकेने या वर्षीचे ५०० कोटी रुपये मालमत्ता कर वसुलीचे लक्ष्य ठेवले आहे. पालिकेने आतापर्यंत २५० कोटी रुपये मालमता कराचे वसूल केले आहेत. अजूनही या वर्षीच्या मालमता कराची पालिकेला वसुली करायची आहे. मालमत्ता कर भरण्यासाठी योग्य प्रतिसाद नसल्यामुळे महापालिकेने सक्तीचा मार्ग अवलंबला आहे. जानेवारी २०२३ पर्यंत कर न भरल्यास त्यांना दरमहा दोन टक्के दंड आकारला जाणार आहे.
वसई-विरार महापालिकेने मालमत्ताकराच्या संकलनाचा २५० कोटी रुपयांचा टप्पा नुकताच पार केला आहे.. महापालिकेच्या इतिहासात केवळ दोन वर्षी २५० कोटींचा टप्पा पार करण्यात पालिकेला यश आले आहे. याआधी मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात २५० कोटींचा कर जमा करण्यात यश आले आहे.
वसई-विरार महानगरपालिकेने यंदा मालमत्ताकराचे ५०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. जर पालिकेने मोकळ्या जागेवर कर आकारला असता तर पालिकेच्या उत्पन्नात वार्षिक ५० कोटींची भर पडली असती. २०१७ मध्ये शासननिर्णय देखील काढण्यात आला होता. या नुसार सर्व महापालिकांमध्ये मोकळ्या जागेवरील कर आकारणी करण्यात येत असते. मात्र वसई-विरार महापालिकेत अद्याप मोकळ्या जागेवरील कर आकारणी करण्यात आलेली नाही. यामुळे दरवषी पालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत होते. नागरिकांनी मालमत्ता कराचा भरणा करावा असे पुन्हा एकदा आवाहन पालिकेने केले आहे. आर्थिक दंडाच्या कडक कारवाईमुळे जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच २५० कोटींचा मालमत्ता कराचा टप्पा पार करण्यात पालिकेला आले आहे. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात ५२१ कोटीचे ठेवले होते. त्यामध्ये पालिकेने मार्च अखेरपर्यंत एकूण ३२० कोटी ७६ लाख इतकी मालमत्ता कर तर १४.५७ करोड रुपये मोबाईल मनोरे कराचा समावेश आहे.