ठाणे : शहरातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली असून आज ४९ नवीन रुग्णांची भर पडली तर जिल्ह्यात १७६ रूग्ण वाढले आहेत.
नवी मुंबई महापालिका हद्दीत ७४, कल्याण-डोंबिवली येथे १८, मीरा-भाईंदरमध्ये २७जण, उल्हासनगर भागात तीन आणि भिवंडी महापालिका परिसरात शून्य रूग्ण सापडले आहेत तर बदलापूर भागात एक रूग्ण नोंदवला आहे. ठाणे ग्रामिण परिसरात चार रुग्णांची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील घरी आणि रुग्णालयात ७६८जणांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत सात लाख ३४,६०३जण बाधित सापडले आहेत तर सात लाख २२,४३९जण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत ११,९२९जणांचा मृत्यू झाला आहे.