ठाणे : महाराष्ट्र राज्य परिवहन ठाणे विभागाकडून दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील उन्हाळी जादा फे-यांचे विभागाकडून आगारनिहाय नियोजन करण्यात आले आहे. या फे-या या नियमित फे-या व्यतिरिक्त 10 एप्रिलपासून ते 15 जून 23 पर्यंत या कालावधीत लांब व मध्यम पल्ला मार्गावर ४६ ज्यादा फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.
ठाणे आगार एकतर्फे बोरिवली ते मंचर, ठाणे खेड मार्गे मुंब्रा, ठाणे ते बेळगाव, ठाणे ते रावेर व्हाया चोपडा, ठाणे ते शिर्डी, नारायणगाव,केळशी, बोरीवली ते आटपाडी व्हाया भाडुप,कोरेगाव वडुजपर्यंत एसटी सेवा मिळणार आहे.
ठाणे विभाग दोनतर्फे बोरिवली ते शिराळा व्हाया भांडुप, ठाणे-श्रीवर्धन व्हाया मुंब्रा, ठाणे-विटा व्हाया, रहिमतपूर पुसेसावळे, चोराडे, बोरिवली ते आंबेजोगाई व्हाया अहमदनगर, भिवंडी विभागातर्फे भिवंडी ते जुन्नर, भवंडी ते अक्कलकोट व्हाया नगर, भिवंडी ते कारंजा, भिवंडी ते कळंब आणि भिवंडी ते माजलगाव या मार्गावर, शहापूर आगार ते शिर्डी, शहापूर ते चोपडा आणि शहापूर ते साक्री, कल्याण विभागामार्फत कल्याण ते कोरेगाव व्हाया वाठार स्टेशन, कल्याण ते वडूज व्हाया रहिमतपूर, कल्याण-सोलापूर व्हाया कर्जत, कल्याण-चोरवणे व्हाया खेड, कल्याण व्हाया नवापूर, कल्याण ते जुन्नर, कल्याण ते पाटगाव या मार्गावर आणि मुरबाड विभागातर्फे कल्याण ते आळेफाटा, कल्याण ते साकोरी, मुरबाड ते धुळे, कल्याण ते शेवगाव, विठ्ठलवाडी आगार ते दापोली, बदलापूर ते दापोली, पनवेल ते काजुरली, बदलापूर जळगाव व्हाया धुळे, विठ्ठलवाडी ते बुलढाणा, पाडळी दर्या, वाडा ते जेजुरी, जामनेर आणि संगमनेर या मार्गांवर उन्हाळी जादा फे-या एस.टी महामंडळ चालवणार आहे.