कल्याण-डोंबिवलीत ४२ नवे रुग्ण

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ४२ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ४९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज एक मृत्यू झाला आहे.

आजच्या या ४२ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४३ हजार ४४ झाली आहे. यामध्ये ७३२ रुग्ण उपचार घेत असून एक लाख ३९ हजार ५४७ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २७६५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आजच्या ४२ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व सहा, कल्याण पश्चिम-२२, डोंबिवली पूर्व-१०, डोंबिवली पश्चिम चार या रुग्णांचा समावेश आहे.