ठाण्यात नवीन ३९ रुग्ण

ठाणे : शहरातील कोरोना रुग्णांची संख्या किंचित वाढली आहे. आज ३९ नवीन रुग्णांची भर पडली ७२जण कोरोनामुक्त झाले आहेत तर एक रूग्ण दगावला आहे.

महापालिका हद्दीत सर्वाधिक २० रूग्ण माजिवडे-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात सापडले आहेत. पाच रूग्ण उथळसर, चार जण लोकमान्य-सावरकर नगर आणि तीन रूग्ण नौपाडा-कोपरी प्रभाग समिती भागात वाढले आहेत. प्रत्येकी दोन जण वर्तकनगर नगर, मुंब्रा आणि वागळे प्रभाग समिती येथे नोंदवले गेले आहेत तर दिवा आणि कळवा प्रभाग समितीच्या हद्दीमध्ये झाली आहे.

विविध रुग्णालयात आणि घरी उपचार घेत आलेल्या रूग्णांपैकी ७२जण रोगमुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ८०,७९७ रूग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. रुग्णालयात आणि घरी ३३४ जणांवर उपचार सुरू आहेत. एक रूग्ण दगावला असून आत्तापर्यंत २,१२७जणांचा मृत्यू झाला आहे.

महापालिका प्रशासनाने काल शहरातील १,६३२ नागरिकांची चाचणी घेतली होती. त्यामध्ये ३८जण बाधित सापडले आहेत. आत्तापर्यंत २३ लाख ७०,३४४ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ८३,२५७ जण बाधित मिळाले आहेत.