श्रेयासाठी शिवसेना-राष्ट्रवादीत जुंपली
ठाणे : ठाणे शहरातील म्हाडाच्या सोसायट्यांच्या लीज रेंट आणि एन ए करावरील व्याज आणि दंड असा मिळून जवळपास ३५ कोटी माफ करण्यात आल्याने सुमारे साडेतीन हजार कुटुबिंयांना दिलासा मिळाला आहे. पाचपाखाडी आणि सावरकर नगरमध्ये ११० सोसायट्या असून श्रेयासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांमध्ये चांगलीच चढाओढ लागली आहे.
ठाण्यातील पाचपाखाडी, सावरकर नगर भागामध्ये म्हाडाच्या अल्प उत्पन्न गटातील जवळपास 110 सोसायट्या गेल्या अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहेत. या सोसायट्यांमध्ये मिळून २००० च्या आसपास कुटुंबे वास्तव्यास आहेत. या सोसायट्यांच्या जमिनीची मालकी अद्याप म्हाडाकडे आहे. स्थानिक नागरिक एनए कर भरण्यास तयार आहेत. मात्र, त्यावर तसेच लीज रेंटवर व्याज आकारण्यात येत असल्याने नागरिकांना ही रक्कम भरणे डोईजड झाली आहे. हा व्याजदर चौपट ते पाचपट असून दंड देखील आकारला जाण्याची शक्यता असल्याने रहिवासी हवालदिल झाले होते. व्याज आणि दंडाचा प्रश्न आता मार्गी निघाला असून जवळपास ३५ कोटींचे व्याज आणि दंड माफ करण्यात आला असल्याचे कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ यांच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयाचा फायदा केवळ पाचपाखाडी आणि सावरकर नगर परिसरातील म्हाडाच्या सोसायट्यांना मिळाला नसून ठाणे शहरातील पवार नगर, वसंत विहार, स्वामी विवेकानंद नगर, शिवाई नगर, लोकमान्य नगर या परिसरातील सर्वच म्हाडाच्या सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या साडेतीन हजार कुटुंबियांना मोठा दिलासा मिळणार आहे. या कामाचे सर्व श्रेय हे राष्ट्रवादीचे
असून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळेच हे शक्य झाले असल्याचा दावा राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे आणि अमित सरय्या यांनी केला आहे. तर शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप बारटक्के यांनीही हँडबिल वाटून श्रेय घेण्याचा प्रयत्न के ला आहे. या पूर्वी दसु र्याचे श्रेय लाटण्याची संस्कृ शिवसेनेमध्ये नव्हती. मात्र, नरेश म्हस्केहे जिल्हाप्रमुख झाल्यापासून शिवसेनेमध्ये दुसर्याचे श्रेय घेण्याची संस्कृती वाढीस लागल्याची टीका आनंद परांजपे यांनी केली आहे. तर आनंद परांजपे यांना दसऱ्यांवर टीका करण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे. प्रसिद्धी मिळत असल्यानेच आनंद परांजपे
माझ्यावर टीका करत असतात, असाही आरोप म्हस्के यांनी केला आहे.