ठाण्यात कोरोनाचे ३२३ नवीन रुग्ण

ठाणे : शहरातील कोरोना रुग्णांची वाढ तीव्र गतीने होत असून आज तब्बल ३२३ नवीन रुग्णांची भर पडली आहे तर १३६ जण रोगमुक्त झाले आहेत. नवीन ए बी व्हेरियंटचा एक रूग्ण सापडला असून त्यांची संख्या तीन झाली आहे.

महापालिका हद्दीत सर्वाधिक १५० रुगणांची भर माजिवडे-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात झाली आहे. ५७जण वर्तकनगर, २७ रूग्ण लोकमान्य-सावरकरनगर, २५जण कळवा प्रभाग समिती, २३जण वागळे आणि २२ रूग्ण उथळसर प्रभाग समिती परिसरात सापडले आहेत. नौपाडा-कोपरी प्रभाग समितीमध्ये नऊ, मुंब्रामध्ये पाच आणि दिवा प्रभाग समिती भागात चार रुग्णांची नोंद झाली आहे तर एका रुग्णाच्या घरचा पत्ता मिळू शकला नाही.

महापालिका प्रशासनाने काल १,५५२ नागरिकांची चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये ३२३जण बाधित सापडले आहेत. काल दोन ए बी व्हेरीयंटचे रूग्ण सापडले होते. आज पुन्हा एक रूग्ण सापडला असून या नवीन प्रकारच्या रुग्णांची संख्या तीन झाली आहे. त्यापैकी दोन रूग्ण बरे झाले आहेत. एक रूग्ण घरात उपचार घेत आहे. आत्तापर्यंत एक लाख ८२,८४१जण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर रुग्णालयात आणि घरी तर १,६०३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत २,१३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महापालिका प्रशासनाने आत्तापर्यंत २४ लाख ४३,६०३ नागरिकांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ८६,५७५जण बाधित मिळाले आहेत.