चिंबीपाडा आश्रमशाळेतील ३० विद्यार्थी कोरोनाबाधित

ठाणे : भिवंडी तालुक्यातील चिंबीपाडा आश्रमशाळेतील ३० विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामध्ये २३ मुली, ५ मुले व दोन कर्मचारी आहेत.

या आश्रमशाळेतील मुलांना सर्दी, तापाची लक्षणे आढळून आल्याने चिंबीपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत त्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी १९८ विद्यार्थ्यांची रॅपिड अँटिजेंन चाचणी करण्यात आली त्यात ३० विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आले. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आल्याचे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी सांगितले.