ठाणे : शहरातील कोरोना रूग्णवाढीचा आलेख चढताच असून आज ३५८ नवीन रुग्णांची भर पडली आहे. एकट्या माजिवडे-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात २७३ रूग्ण सापडले आहेत तर १५८ जण रोगमुक्त झाले आहेत.
महापालिका हद्दीत वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रात ६९ रूग्ण वाढले आहेत. २९ रूग्ण उथळसर, २८जण लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समिती क्षेत्रात सापडले आहेत. नौपाडा-कोपरी प्रभाग समिती परिसरात २३, वागळे प्रभाग समितीमध्ये १३, कळवा प्रभाग समिती येथे १२ आणि सात रूग्ण दिवा प्रभाग समितीमध्ये नोंदवले गेले आहेत. सर्वात कमी तीन रुग्णांची नोंद मुंब्रा भागात करण्यात आली आहे. एका रुग्णाच्या घरचा पत्ता मिळू शकलेला नाही.
विविध रुग्णालयात आणि घरी उपचार घेत असलेल्या रूग्णांपैकी १५८जण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ८२,९९९ रूग्ण ठणठणीत बरे झाले आहेत तर रुग्णालयात आणि घरी १,८०३जणांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत २,१३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
महापालिका प्रशासनाने काल शहरातील १,६९५ नागरिकांची चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये ३५८जण बाधित मिळाले आहेत. आत्तापर्यंत २४ लाख ४५,३०७ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ८६,९३३जण बाधित सापडले आहेत.