मीरा-भाईंदर महापालिका परिवहन सेवेत २६ ई बस

भाईंदर: मीरा-भाईंदर महापालिका परिवहन सेवा ताफ्यात २६ ई-बसचा समावेश करण्यात आला आहे. त्यापैकी १८ ई-बस आरटीओमध्ये नोंदणीनंतर सुरू झाल्या आहेत.

यापूर्वी एमबीएमटी सेवेत विविध मार्गांवर ७४ डिझेल बसेस चालवण्यात आल्या होत्या. सध्या महापालिका परिवहन सेवेच्या बसेसमधून दररोज सुमारे ९७ हजार प्रवासी प्रवास करतात. परिवहन सेवेने दैनंदिन प्रवासी संख्या १.२५ लाखांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर यांनी दिली.

मुंबईलगत असलेल्या आणि झपाट्याने विकसित होतअसलेल्या
मीरा-भाईंदर शहराच्या लोकसंख्येच्या वाढीनुसार महापालिका परिवहन सेवेच्या बसेसची संख्या वाढवणे बंधनकारक होते. बस प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी आणि पर्यावरण रक्षणाच्या उद्देशाने 15 व्या वित्त आयोगाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत 57 नवीन इलेक्ट्रिक बसखरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये 9 मीटर लांबीच्या 32 नॉन एसी बसेस आणि 12 मीटर लांबीच्या एकूण 25 बसेसचा समावेश परिवहन सेवेच्या ताफ्यात करण्यात येणार होता.12 मीटर लांबीच्या 25 पैकी 10 बसेस एसी (वातानुकूलित) असतील. तर १५ बसेस नॉन एसी असतील. यापैकी 57 बसेस पैकी आतापर्यंत महापालिकेला २६ बसेस मिळाल्या आहेत. याशिवाय केंद्र सरकारच्या ‘पीएम-ई बस’ योजनेअंतर्गत 100 बसेस मिळणार आहेत.

महापालिकेच्या परिवहन सेवेत समाविष्ट करण्यात आलेल्या नवीन ई-बस प्रायोगिक तत्त्वावर नवीन मार्गांवर सुरू करण्यात आल्या आहेत.प्रायोगिक तत्त्वावर नवीन मार्गांवर बसेस चालवण्यास सुरुवात झाली.

बस मार्ग क्रमांक 5 (भाईंदर पी. स्टेशन ते 60 फूट रोड, काशिमीरा नाका मार्गे मॅक्सस मॉल). सध्या रस्त्याच्या कामामुळे भाईंदर पोलीस ठाण्यामधून मार्ग काढला जात आहे. बस मार्ग क्रमांक 20 (भाईंदर पश्चिम मार्गे मोरवा भाट, मॅक्सस मॉल), बस मार्ग क्रमांक 25 (मीरा रोड पूर्व स्थानक ते काशिमीरामार्गे सृष्टी, शांती गार्डन, मीरागाव, प्लेझेंट पार्क), बस मार्ग क्रमांक 28 (मीरा रोड पूर्व स्थानक ते नयानगर, दीपक हॉस्पिटल, पूर्वी सुरू झालेला बस मार्ग क्रमांक 23, भाईंदर पूर्व स्टेशन ते पेणकर पाडा मार्गे बोरिवली नॅशनल पार्क मार्गे बाळासाहेब ठाकरे मैदान, इंद्रलोक पोलिस स्टेशन आणि भाईंदर पूर्व स्टेशनपर्यंत वाढवण्यात आला आहे. नवीन बस मार्गावर बससेवा सुरू झाल्याने महापालिका परिवहन सेवेच्या बसेस शहरातील एकूण २४ मार्गांवर धावणार आहेत.