शीळ-कळवा-मुंब्य्रातील 250 ग्राहकांनी थकवले सहा कोटींचे वीज बिल

नियमानुसार कडक कारवाईचा टोरंटचा इशारा

ठाणे : शिळ-मुंब्रा-कळवा भागात सुमारे 250 ग्राहकांनी सुमारे सहा कोटींची वीजबिले थकवली असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा टोरंट कंपनीने दिला आहे.

या 250 ग्राहकांवर टोरंटद्वारे नियमांनुसार कठोर कारवाई केली जाईल तसेच त्यांची नावेही सार्वजनिक होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे प्रशासनाने एक प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

एसएमके फ्रँचायझी क्षेत्रातील टोरंटची एकूण थकबाकी सुमारे 145 कोटीवर पोहोचली आहे. यामुळे कंपनी कठोर वसुली मोहीम सुरू करणार आहे. बिल न भरल्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्यासारख्या गैरसोयीला सामोरे जावे लागू नये, यासाठी कंपनीने ग्राहकांना त्यांची वीज देयके वेळेवर भरण्याचे आवाहन केले आहे.