ठाणे : शहरात कोरोना रूग्णवाढीचा विस्फोट झाला आहे. आज तब्बल अडीचशे नवीन रुग्णांची भर पडली असून ठाणेकरांनी चिंता वाढली आहे. दरम्यान ८९जण कोरोनामुक्त झाले आहेत.
महापालिका हद्दीत सर्वाधिक १०८ रूग्ण कोरोना हॉट स्पॉट असलेल्या माजिवडे-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात सापडले आहेत. ४४ रूग्ण वर्तकनगर प्रभाग समिती भागात वाढले आहेत. उथळसर प्रभाग समिती येथे ३० रुग्णांची भर पडली आहे. नौपाडा-कोपरीमध्ये २०, लोकमान्य-सावरकर नगरमध्ये १८ आणि कळवा प्रभाग समिती परिसरात १७ रुग्णांची नोंद झाली आहे. वागळे प्रभाग समिती क्षेत्रात सहा आणि मुंब्रा प्रभाग समिती येथे पाच असे २४९ रूग्ण शहरात वाढले आहेत.
विविध रुग्णालयात आणि घरी उपचार घेत असलेल्या रूग्णांपैकी ८९जण रोगमुक्त झाले आहेत तर रुग्णालयात १२४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत एक लाख ८२,४७५जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील अनेक दिवस एकही रूग्ण दगावला नसून आत्तापर्यंत २,१३० रुग्ण दगावले आहेत.
महापालिका प्रशासनाने काल शहरातील १,१०९ नागरिकांची चाचणी घेतली होती. त्यामध्ये २४९ जण बाधित सापडले आहेत. आत्तापर्यंत २४ लाख ४०,०८६ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये एक लाख ८५,८५३जण बाधित मिळाले आहेत.