दोन वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याची मुदत
ठाणे: ठाणे शहरातील पूर्व द्रुतगती महामार्गावरील ‘तीन हात नाका’येथे वाहतूक सुधारणा होणार आहे, अशी चर्चा गेल्या कित्येक वर्षांपासून ऐकिवात असताना, आत्ता मात्र ही संकल्पना प्रत्यक्षात उतरणार आहे. या महत्वाच्या कामाची अंदाजित रक्कम 240 कोटी 84 लाख रुपये आहे,अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकारा-यांनी ‘ठाणेवैभव’ला दिली.
या कामाचा कालावधी 24 महिने असणार असून पावसाळ्यातही अधिक तीन महिने हे काम सुरुच राहणार आहे, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यात दोष दायित्व कालावधीदेथील अभिप्रेत आहे. या कामांसाठी चर्चा करण्यासाठी निविदापूर्व बैठक मुख्य अभियंता यांच्या दालनात 12 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 15 वाजता करण्यात आली होती. त्यानंतर, ई-निविदा डाउनलोड करण्याचा कालावधी 29 ऑक्टोबर 2024 रोजी 11 वाजता आणि अंतिम 25 नोव्हेंबर 2024 रोजी अकरा वाजता होता. कामाची अंदाजित रक्कम 240 कोटी 84 लाख एवढी आहे.
तीन हात नाका येथील वाहतूक सुधारणा प्रकल्पावर अधिका-यांच्या बैठकीत चर्चा आणि पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनही झाले आहे. या बैठकीत मेट्रो मास्टर प्लॅनचा समावेश असलेला प्रकल्प, अलाइनमेंट, स्टेशनसह तपशील, याशिवाय आजूबाजूची ठिकाणे आणि सोयी-सुविधा, बांधकामाची पद्धत, खर्च आणि आर्थिक दायित्वे, पर्यावरणीय आणि सामाजिक प्रभाव आणि सुरक्षितता आदी तांत्रिक बाबींवर ‘एमएमआरडी’च्या थिंक टँक’ करण्यात आली. यावेळी प्रकल्पाचे सादरीकरणही वरिष्ठ अधिका-यांनी केले.