१८२ नामनिर्देशनपत्रांचे वाटप
ठाणे : विधानसभा निवडणूक 2024 साठी आज ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातून विविध पक्षांच्या एकूण 24 उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज सादर केले तर एकूण 182 नामनिर्देशनपत्रांचे वाटप करण्यात आले.
भिवंडी मतदारसंघातून आज एकूण सहा नामनिर्देशनपत्रांचे वाटप करण्यात आले. शहापूर (अ.ज.) मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दोन (अजित पवार गट) उमेदवार दौलत दरोडा यांनी तर शर्मिला शेळके यांनी उमेदवारी अर्ज सादर केले. तर आज एकूण 11 नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले.
भिवंडी पश्चिम मतदारसंघातून आज भारतीय जनता पार्टीचे दोन उमदेवार मेघना चौघुले व महेश चौघुले यांनी तर दोन अपक्ष उमेदवार निशाल भोईर व प्रकाश टावरे यांनी आपले उमेदवारी अर्ज सादर केले. तर आज एकूण 18 नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले.
भिवंडी पूर्व मतदारसंघातून आज एकूण पाच नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले. कल्याण पश्चिम मतदारसंघातून आज समता पार्टीचे उमेदवार रंजनी देवळेकर यांनी, निर्भय महाराष्ट्र पार्टीचे उमेदवार संदीप नाईक यांनी तर अपक्ष दोन उमेदवार मोनिका पानवे व अश्विनी मोकासे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तर आज एकूण 26 नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले.
मुरबाड मतदारसंघातून अपक्ष उमेदवार शरद पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज अंजली पवार यांच्याकडे सादर केला. तर एकूण 12 नामनिर्देशन अर्जाचे वाटप करण्यात आले.
अंबरनाथ मतदारसंघातून अपक्ष उमेदवार देविदास निकम यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर आज एकूण 13 नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले.
उल्हासनगर मतदारसंघातून दोन अपक्ष उमेदवार अनिल तोताणी व पूजा वाल्मिकी यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांच्याकडे सादर केला. तर आज एकूण आठ नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले.
कल्याण पूर्व मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुलभा गायकवाड (डमी) यांनी तर दोन अपक्ष उमेदवार विवेक पांडे व सचिन पोटे यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. तर एकूण 19 नामनिर्देशन पत्रांचे वाटप आज करण्यात आले.
डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून आज एकूण दोन नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून आज एकूण आठ नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले.
मीरा-भाईंदर मतदारसंघातून 10 नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले.ओवळा माजिवडा मतदारसंघातून शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार नरेश मणेरा यांनी तर अपक्ष उमेदवार सुनील चिकणे यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. तर एकूण नऊ नामनिर्देशनपत्रांचे वाटप करण्यात आले.
कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून एकूण तीन नामनिर्देशन पत्राचे वाटप करण्यात आले. ठाणे मतदारसंघातून आज राष्ट्रीय मराठा पार्टीचे उमेदवार हिंदुराव पाटील, राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे (शरद पवार गट) उमेदवार दीपक क्षत्रिय यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. तर आज एकूण तीन नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले. कळवा-मुंब्रा मतदारसंघातून आज 10 नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले. ऐरोली विधानसभा मतदारसंघातून आज अपक्ष उमेदवार राजीव भोसले यांनी तर महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उमेदवार अंकुश कदम यांनी आपला नामनिर्देशन अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सुचिता भिकाणे यांच्याकडे सादर केला. तर आज एकूण 11 नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले. बेलापूर विधानसभा आज एकूण आठ नामनिर्देशन पत्राचे वाटप करण्यात आले.