ठाणे: शहरातील कोरोना रुग्णांचा आलेख पुन्हा वर गेला आहे. आज २३९ नवीन रुग्णांची भर पडली आहे तर २९८जण कोरोनामुक्त झाले आहेत. एक जण दगावला आहे.
महापालिका हद्दीत सर्वात जास्त ११३ रूग्ण माजिवडे-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात वाढले आहेत. २३ उथळसर, ३३ वर्तकनगर आणि १७ रूग्ण लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समिती क्षेत्रात वाढले आहेत. कळवा येथे १४, वागळेमध्ये ११, दिवा भागात १० आणि नौपाडा-कोपरी प्रभाग समिती परिसरात १२ रुग्णांची नोंद झाली आहे. सर्वात कमी तीन जण मुंब्रा येथे नोंदवले गेले आहेत तर तीन रुग्णांच्या घरचा पत्ता मिळू शकला नाही.
विविध रुग्णालयात आणि घरी उपचार घेत असलेल्या रूग्णांपैकी २९८जण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ८६,९२९ रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर रुग्णालयात आणि घरी २०६४जणांवर उपचार सुरू आहेत. आज एक रूग्ण दगावला असून आत्तापर्यंत २,१३६जणांचा मृत्यू झाला आहे.
महापालिका प्रशासनाने काल शहरातील १,६३१ नागरिकांची चाचणी घेतली होती. त्यामध्ये २३९जण बाधित सापडले. आत्तापर्यंत २४ लाख ६६,०८७ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ९१,१२९जण बाधित मिळाले आहेत.