पाच जणांना कुटुंबांनी घराचे दार केले कायमचे बंद
ठाणे : मनोरुग्णांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय विविध प्रकारे प्रयत्न करत आहे. कुटुंबीयांनी नाकारलेल्या मनोरुग्णांना शासकीय यंत्रणेद्वारे संबंधितांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी विशेष प्रयत्न केले असून, आत्तापर्यंत तब्बल २,३०० मनोरुग्णांना त्यांच्या घरी ‘वापस’ करण्यात आले आहे. तर पाच जणांना त्यांच्या कुटुंबांनी घरातच घेतले नाही, त्यामुळे त्यांना मनोरुग्णालयात परतावे लागले आहे.
1 एप्रिल 22 ते मार्च 23 या कालावधीत बरे झालेल्या 2088 मनोरुग्णांंनाही त्यांच्या घरी पाठवले होते. यात 682 स्त्रिया तर 1406 पुरुषांचा समावेश होता. परंतु इतके केल्यानंतरही अनेकजण दार उघडत नाहीत किंवा दाराला कुलूप लावून निघून जातात, असे कटू अनुभव आम्हाला आले आहेत, अशी माहिती रुग्णालयातील परिचारिका, वॉर्डबॉयनी दिली.
‘मनोरुग्णांचे पालनपोषण करण्यास त्यांचे कुटुंब असमर्थ असते, काहींचे कुटुंब हयात नसते. त्यांना नातेवाईक नाकारतात अशांचे ठाणे पुनर्वसन मानसिक आरोग्य आढावा मंडळ यांच्या आदेशाने ‘जागृती पालक’संस्थेत दाखल करण्यात आले. अशा मनोरुणांची संख्या 72 आहे.
शासकीय यंत्रणेद्वारे मनोरुग्णाला कुटुंबांशी मिळवून देणे हे खुपच अवघड असते, असे डॉ. नेताजी मुळीक यांनी सांगितले. मनोरुग्णांना कुटुंबात राहण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी वाहन आणि चालक परिचर वर्ग यांचा खुप मोठा वाटा असतो असेही ते म्हणाले. स्वगृही झालेल्या स्त्री 813 आणि पुरुष 1489 असून एकूण 2302 इतके आहेत.
जागृती संस्थेतर्फे झालेल्या मूळ पुनर्वसन केलेल्या रुग्णांची एकूण संख्या 72 आहे. त्यात जास्ती करून 52 पुरुष आणि स्त्रिया आहेत.
‘बरा झालेला एक रुग्ण हा कुटुंबात राहिला. तर त्याची मानसिक स्थिती आणखी सुदृढ झाली. त्यामुळे त्याला कुटुंबीयांशी मिलन करण्याचे अथक प्रयत्न करण्यात आले. तो प्रयत्न यशस्वी झाल्यामुळे त्याच अनुषंगाने संबंधित रुग्णांना त्यांच्या घरी पाठवण्याचे निश्चित केले आणि ते यशस्वी झाले. त्यामुळे एक एप्रिल 2023 ते 31 मार्च २४ या आर्थिक वर्षात 2300 मनोरुग्णांना त्यांच्या ‘निवासी’पाठवण्यात मोठे यश आले आहे, अशी माहिती ठाणे मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांनी दिली.
सध्या मनोरुग्णालयात 5002 पुरुष तर 290 स्त्रिया असे एकूण रुग्ण उपचार घेत आहेत. गेल्या आर्थिक वर्षात 2302 बरे झालेल्या रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांनी घेऊन गेले आहेत.
कुटुंबांशी संपर्क करून पत्रव्यवहार करून आणि घरी पोलिसही पाठवून व समुपदेशन या सर्व प्रयत्नांना यश आल्यावर शासकीय खर्चातून मनोरुग्णांना शासकीय कर्मचारी घरी घेऊन जातात, परंतु तिथे गेल्यावरही तासनतास उभे केले जाते, असाही अनुभव मिळाला होता, असे वॉर्डबॉय म्हणाले.