ठाणे: शहरातील कोरोना रूग्णवाढ किंचित कमी झाली आहे. ११ नवीन रुग्णांची ठाणे शहरात तर जिल्ह्यात २१ रूग्ण वाढले आहेत. सुदैवाने आजही एकही रूग्ण दगावला नाही.
जिल्ह्यात नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आठ रूग्ण सापडले आहेत तर प्रत्येकी एका रुग्णाची भर कल्याण डोंबिवली आणि ठाणे ग्रामीण परीसरात पडली आहे. उर्वरित महापालिका नगरपालिका परिसरात एकाही नवीन रुग्णाची नोंद झाली नाही.
जिल्ह्यात आत्तापर्यंत सात लाख ९,५७५जण बाधित सापडले आहेत तर १७३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत सहा लाख ९७,४१० रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. आज एकही रूग्ण दगावला नसून आत्तापर्यंत ११,८९५जणांचा मृत्यू झाला आहे.