नवी मुंबई: शानानने बंदी घातलेल्या प्लास्टिक विक्री विरोधात महाराष्ट्र प्रदूषण मंडळ व नवी मुंबई महानगर पालिकेने दंड थोपटले आहेत.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी जयंत कदम, व क्षेत्र अधिकारी अजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा उप आयुक्त डॉ.राहुल गेठे (घ.क.व्य) उप आयुक्त सोमनाथ पोटरे (परि-१) सहाय्यक आयुक्त भरत धांडे, स्वच्छता अधिकारी, जयेश पाटील यांच्या उपस्थितीमध्ये तुर्भे विभाग कार्यक्षेत्रात प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर करणार्या व सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून उपद्रव करणार्या व्यावसायिकांवर नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.या कारवाई करून एकूण २० हजार रुपये दंडात्मक शुल्क वसूल करण्यात आले.