शहरात आज नवीन १९ रुग्णांची नोंद

ठाणे – शहरातील नवीन कोरोना रुग्णांचा आकडा आज किंचित वाढला आहे. आज १९ रुग्णांची भर पडली असून १७ जण रोग मुक्त झाले आहेत. तर एकही रूग्ण दगावला नाही.

महापालिका हद्दीतील माजीवडा मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात सर्वाधिक १५ रूग्ण वाढले आहेत. तर प्रत्येकी एका रुग्णाची भर वर्तकनगर, नौपाडा कोपरी आणि मुंब्रा प्रभाग समिती परिसरात पडली आहे. तसेच सर्वात कमी शून्य रुग्णाची नोंद लोकमान्य सावरकरनगर, उथळसर, वागळे, कळवा आणि दिवा प्रभाग समिती भागात झाली आहे. एका रुग्णाच्या घरचा पत्ता मिळू शकला नाही.

विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रूग्णांपैकी १७ जण रोग मुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ८१ हजार ३७५ रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर रुग्णालयात आणि घरी ९५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज दिवसभरात एकही रूग्ण दगावला नसून आत्तापर्यंत दोन हजार १२७ जणांचा मृत्यू झाला आहे. महापालिका प्रशासनाने काल शहरातील ८३६ नागरिकांची कोरोना चाचणी केली होती. त्यामध्ये १९ जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. आत्तापर्यंत २३ लाख ९० हजार २९४ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये एक लाख ८३ हजार ५९७ जण बाधित मिळाले आहेत.