प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात
ठाणे : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून कल्याण-तळोजा या मेट्रो 12 प्रकल्पासाठी तब्बल 1877 कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरू होणार आहे.
कल्याण-तळोजा हा मेट्रो प्रकल्प पुढे ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो पाच या प्रकल्पाला जोडण्यात येणार आहे. ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो 5 आणि मेट्रो 12 मुळे ठाणे ते नवी मुंबई हा प्रकल्प शहरांचा अंतर्गत वाहतुकीचा चेहरामोहरा बदलला जाणार आहे. सुमारे 5865 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे वर्षभरात सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले होते.
मेट्रो बाराचे अंतर 20.75 किलोमीटर असून मेट्रो उन्नत मार्गावरून धावणार आहे. या मार्गावर कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती, गणेश नगर, पिसवली गाव, गोलवली, डोंबिवली एमआयडीसी, सागाव, सोनारपाडा, मानपाडा, कोळेगाव, निळजे गाव, वडवली, तुर्भे, पिसार्वे आणि तळोजा अशी स्थानके असतील.
सुमारे 5865 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे वर्षभरात सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले होते. एमएमआरडीएच्या या मेट्रोच्या स्थापत्य बांधकामासाठी निविदा जाहीर केली आहे. एकूण 1877.88 कोटींची ही निविदा आहे. यात १७ स्थानके, मेट्रो 5 आणि मेट्रो कार्सला जोडणा-या मार्गिकेचे काम, बांधकाम केले जाणार आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यास मेट्रोच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे. मेट्रो चार वडाळा ते ठाणे शहरांना जोडण्यात येणार आहे आणि ठाण्यातून मेट्रो 5 सुरू होणार आहे. ती भिवंडीमार्गे कल्याणपर्यंत येणार आहे.