राज्यात मंगळवारी 182 रुग्णांची नोंद

मुंबई : राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत चढउतार होताना दिसत आहे. सोमवारी राज्यात 182 रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या देखील हजारापार गेली आहे. राज्यात सध्या  1027 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. तसेच गेल्या चोवीस तासात एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 170  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

राज्यात आज एका कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,29, 303 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के झाले आहे. राज्यात आजपर्यंत 8,02,50, 528  प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहेत.

राज्यात सध्या 1027 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. यामध्ये राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईत 637 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. त्या खालोखाल अॅक्टिव्ह रुग्ण पुण्यात आहे. पुण्यात 210,  ठाण्यात 92 अॅक्टिव्ह रुग्ण आहे.