जिल्ह्यात १८ तर ठाणे शहरात ११ रुग्णांची भर

ठाणे: शहरातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या किंचित कमी झाली आहे. आज ११ रुग्णांची भर पडली आहे तर जिल्ह्यात १८ रूग्ण वाढले आहेत.

महापालिका हद्दीत सर्वाधिक सात रूग्ण माजिवडे-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात सापडले आहेत. तीन रुग्णांची भर वर्तकनगर प्रभाग समिती येथे पडली आहे तर एक रूग्ण उथळसर प्रभाग समिती भागात वाढला आहे. उर्वरित सहा प्रभाग समिती परिसरात शून्य रुग्णांची नोंद झाली आहे.

नवी मुंबई महापालिकेत पाच रुग्णांची नोंद झाली आहे तर दोन रूग्ण मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात वाढले आहेत. उर्वरित जिल्ह्यात एकही नवीन रूग्ण सापडला नाही.

जिल्ह्यात आत्तापर्यंत सहा लाख ९७,१९२ रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर रुग्णालयात आणि घरी १४३ जणांवर उपचार सुरू आहे. आज एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आत्तापर्यंत ११,८९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर जिल्ह्यातील सात लाख ९,२६८ ठाणेकर बाधित सापडले आहेत.