ठाण्यात आज १७ नवीन रुग्ण 

ठाणे – शहरात कोरोना रूग्ण वाढीची गती अतिशय मंदावली असून सर्वच प्रभाग समिती क्षेत्रात एक अंकी रूग्ण सापडले आहेत. आज १७ नवीन रूग्ण सापडले असून ३३ जण रोग मुक्त झाले आहेत.  व्हेंटिलेटरवर अवघा एक रूग्ण असून फक्त २७ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

महापालिका क्षेत्रात सर्वाधिक आठ रूग्ण माजीवडा मानपाडा प्रभाग समिती येथे सापडले आहेत.  चार जण वर्तकनगर येथे तर  प्रत्येकी एक रुग्ण नौपाडा कोपरी, वागळे, उथळसर आणि कळवा प्रभाग समिती परिसरातील आहे. लोकमान्य सावरकरनगर, मुंब्रा आणि दिवा प्रभाग समितीमधून एकही रुग्ण सापडला नाही. तर एका रुग्णाच्या घरचा पत्ता मिळू शकला नाही.

विविध रुग्णालयात आणि घरी उपचार घेत असलेल्या रूग्णांपैकी ३३ जण रोग मुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ८१ हजार १७२ रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर रुग्णालयात आणि घरी १५७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  एकही रूग्ण दिवसभरात दगावला नाही.  आत्तापर्यंत दोन हजार १२७ जणांचा मृत्यू झाला आहे.  महापालिका प्रशासनाने काल शहरातील ७७९ नागरिकांची कोरोना चाचणी केली होती.  त्यामध्ये १७ जण पॉझिटिव्ह  सापडले.  आत्तापर्यंत २३ लाख ८१ हजार ९३० ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली होती त्यापैकी एक लाख ८३ हजार ४५६ रूग्ण बाधित मिळाले आहेत.