ठाणे : शहरातील कोरोना रूग्णवाढ सुरूच असून आज ८२ नवीन रूग्ण सापडले. जिल्ह्यात २२७ रुग्णांची भर पडली असून सुदैवाने एकही रूग्ण दगावला नाही.
नवी मुंबई महापालिका हद्दीत ५९ रूग्ण वाढले आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिका भागात ३७ तर मीरा-भाईंदरमध्ये २३ रुग्णांची नोंद झाली आहे. १०जण उल्हासनगर आणि दोन रूग्ण भिवंडी महापालिका परिसरात नोंदवले गेले आहेत. बदलापूरमध्ये चार तर ग्रामिण भागात १० रूग्ण मिळून आले आहेत.
जिल्ह्यातील रुग्णालयात आणि घरी १६०६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत सात लाख ३७,४२५जण बाधित सापडले आहेत तर सात लाख २४,३९८ रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत ११,९३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.