ठाणे : जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने सन 2020-21 मधील युडायस रिपोर्टनुसार व तपासणी अहवालानुसार जिल्हातील १६ अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे संबंधित संस्था चालकांनी त्यांचे संस्थेमार्फत सुरु असलेल्या अनधिकृत माध्यमिक शाळा/वर्ग तात्काळ बंद करुन तसे हमीपत्र माध्यमिक शिक्षण विभागास सादर करण्याचे आदेश माध्यमिक शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनी दिले आहेत. अनधिकृत शाळामध्ये पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश घेवु नये असे आवाहन शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनी केले आहे.
सेंट पॉल इंग्लिश सेंकडरी हायस्कुल चिंचपाडा नवी मुंबई मनक्षेत्र इंग्रजी माध्यमिक विभाग, श्री साई ज्योती सेकंडरी स्कुल, कोपरखैरणे इंग्रजी माध्यमिक विभाग, अल मुनीहाज सेकंडरी हायस्कुल, बेलापूर, नवी मुंबई, इंग्रजी विभाग, प्रगती विद्यामंदिर अंबरनाथ, मराठी विभाग, युनिक इंग्लिश मिडीयम स्कुल, कल्याण, इंग्रजी विभाग, आदर्श विद्यालय, लोढा हेवन (मराठी) कल्याण, मराठी विभाग, पारसिक स्पेशल स्कुल, मीरा-भाईदर मनपा क्षेत्र इंग्रजी विभाग, पारसिक स्पेशल स्कुल, मीरा-भाईदर मनपा क्षेत्र इंग्रजी विभाग, आरकॉम ईस्माईक स्कुल, ठाणे मनपा क्षेत्र, अरुण ज्योत विद्यालय ठाणे मनपा क्षेत्र हिंदी माध्यमिक विभाग अनधिकृत, स्टार इंग्लिश हायस्कुल, ठाणे मनपा क्षेत्र, नालंदा हिंदी विद्यालय, ठाणे मनपा क्षेत्र, हिंदी विभाग, होली मारीया कॉन्व्हेन्ट हायस्कुल, ठाणे मनपा क्षेत्र इंग्रजी माध्यमिक विभाग अनधिकृत, सिम्बॉयसिस कॉन्व्हेंट हायस्कुल , सुंदरबन, दिवा दातिवली, ठाणे मनपा क्षेत्र इंग्रजी माध्यमिक विभाग अनधिकृत, आतमन ॲकॅडमी , ठाणे मनपा क्षेत्र, नॅशनल इंग्लिश स्कूल, दापोडे, ता.भिवंडी, विवेकानंद इंग्लिश हायस्कूल, भिवंडी मनपा क्षेत्र इंग्रजी विभाग या शाळा अनधिकृत म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत.