ठाणे : मागील दोन महिने असलेली एक आकडी रूग्णवाढ आज दोन आकडी झाली. आज १६ नवीन रुग्णांची भर पडली आहे तर एकजण रोगमुक्त झाला आहे.
महापालिका हद्दीतील माजिवडे मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात सात, वर्तकनगर प्रभाग समिती येथे पाच रूग्ण वाढले आहेत तर प्रत्येकी दोन रूग्ण उथळसर आणि कळवा प्रभाग समिती परिसरात सापडले आहेत. उर्वरित पाच प्रभाग समितीमध्ये एकाही रुग्णाची नोंद झाली नाही.
विविध रुग्णालयात आणि घरी उपचार घेत असलेल्या रूग्णांपैकी एक रूग्ण रोगमुक्त झाला आहे. आत्तापर्यंत एक लाख ८१,५६५जण ठणठणीत बरे झाले आहेत तर रुग्णालयात आणि घरी ४१जणांवर उपचार सुरू आहेत. आज एकही रूग्ण दगावला नसून आत्तापर्यंत २१२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
महापालिका प्रशासनाने काल शहरातील २८७ नागरिकांची चाचणी घेतली होती. त्यामध्ये १६जण बाधित सापडले आहेत. आत्तापर्यंत २४ लाख ९,६३९ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ८३,७३३जण बाधित मिळाले आहेत.