ठाणे: शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असून आज १४ नवीन रुग्णांची भर पडली आहे तर १० रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
घरी उपचार सुरू असलेल्या रूग्णांपैकी १० जण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ८१,७४८जण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर घरी ९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सलग सहा दिवस रुग्णालयात एकही रूग्ण दाखल करण्यात आला नाही. आज एकही रूग्ण दगावला नाही. आत्तापर्यंत २,१३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
महापालिका प्रशासनाने काल शहरातील ६२९ नागरिकांची चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये १४जण बाधित सापडले होते. आत्तापर्यंत २४ लाख २१,१११ नागरिकांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ८३,९७१ ठाणेकर बाधित मिळाले आहेत.