भाईंदरमध्ये २२ कोटींचे १४ किलो कोकेन जप्त

दोन नायजेरियन व महिलेस अटक

भाईंदर : काशिमीरा पोलिसांच्या गुन्हे शाखा-१ ने ड्रग्ज माफियांवर मोठी कारवाई करीत १४ किलो ८८३ ग्रॅम कोकेन अमंली पदार्थ जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 22 कोटी रुपये आहे.

या प्रकरणी नायजेरियन जोडप्यासह भारतीय महिला मिळून तिघांना २२ कोटी रुपयांच्या कोकेनसह अटक केले आहे. भाईंदर पूर्व नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोतीलाल नगर परिसरात ही कारवाई करण्यात आली. काशिमीरा गुन्हे शाखा युनिट-1 ला गुप्त माहिती मिळाली होती, त्या आधारावर त्यांनी भाईंदर पूर्वेतील मोतीलाल नगरमध्ये 42 वर्षीय सबिना नजीर शेख यांच्या घरावर छापा टाकला. छाप्यात मोठ्या प्रमाणात कोकेन जप्त करण्यात आले.आहे.

तपासादरम्यान अटक महिला आरोपी हिने तीचे ताब्यात मिळून आलेला कोकेन हा अंमली पदार्थ नायजेरीयन नागरीक अँडी नावाच्या इसमाने तिला दिला असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने नायजेरीयन नागरीक आरोपी अँडी उबाबुडीके यास १५ एप्रिल २०२५ रोजी अटक करुन त्याचे ताब्यातून तीन कोटी ९० लाख, ७२ हजार रुपये किंमतीचा दोन किलो ६०४ ग्रॅम ८ मिलीग्रॅम इतक्या वजनाचा कोकेन हा अंमली पदार्थ व एक लाख ४,४३० रुपयांची भारतीय चलनामधील रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.

या कारवाईत पोलिसांनी दोन महिलांसह तीन आरोपींना अटक केली आहे. यामध्ये एका आरोपी महिला नायजेरियन व नायजेरियन नागरिकाचाही समावेश आहे. अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीवर केलेली ही महत्त्वाची आणि मोठी कारवाई मानली जात आहे. पोलिसांनी आता पुढील तपास सुरू केला असून या प्रकरणाशी संबंधित अन्य लोकांचा शोध सुरू आहे.