मुंबई : मागील काही आठवडे कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत घट होत आहे. देशातील विविध राज्यांमध्ये रुग्णसंख्या बऱ्यापैकी नियंत्रणात आल्याने आता केंद्र सरकारने नव्या अनलॉक गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने इतर व्यवहारही सुरळीत व्हावे यासाठी या नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. राज्यातल्या 14 जिल्ह्यात 4 मार्चपासून नाट्यगृहे, सिनेमागृहे, रेस्टॉरंट्स, पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळेही 100 टक्के क्षमतेने सुरु होणार आहे. इतर जिल्ह्यात 50 टक्के क्षमतेची अट कायम आहे.
मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर, रायगड, वर्धा, रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर, कोल्हापूर या 14 जिल्ह्यात सिनेमागृहे , रेस्टॉरंट्स, पर्यटनस्थळे, धार्मिक स्थळे 100 टक्के क्षमतेने सुरु होणार आहेत.
काय आहेत नवे नियम?
राज्यातील सर्व सरकारी, खासगी कार्यालये 100 टक्के उपस्थितीसह सुरू करण्यास परवानगी
शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी
रेल्वे किंवा बसने प्रवास करताना लसीचे दोन डोस बंधनकारक
चित्रपटगृहे, मॉल्स आणि इतर ठिकाणी प्रवेश देताना लसीचे दोन डोस बंधनकारक
मनोरंजन व उद्याने, जलतरण तलाव, वॉटर पार्क यांनाही पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याच्या परवानगी
लग्नसमारंभ तसंच अंत्यसंस्कार विधी इत्यादींवरील निर्बंधही हटवले आहेत.
14 जिल्हे अनलॉक करण्याचे निकष
पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 90 टक्क्यांपेक्षा अधिक
दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 70 टक्क्यांपेक्षा अधिक
पॉझिटिव्हीटी रेट हा 10 टक्क्यापेक्षा कमी हवा