ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये जुलै 2022 मध्ये डेंग्यूचे संशयित रुग्णसंख्या 64 आणि निश्चित निदान झालेले एकूण 14 रुग्ण आहेत. तर मलेरियाचे 47 रुग्ण आढळून आले व चिकनगुनियाची रुग्णसंख्या शून्य आहे.
यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी गृहभेटी देऊन एकूण 34551 घरांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत 404 घरे दूषित आढळून आली. तसेच एकूण 47383 कंटेनरची तपासणी केली असता 493 कंटेनर दूषित आढळून आली.
या अनुषंगाने दरम्यानच्या कालावधीत कार्यक्षेत्रात 50 हॅण्डपंप, ट्रॅक्टर्स-10, ई रिक्षा 6, 10 बोलेरो वाहनांमार्फत दोन सत्रात 3194 ठिकाणी औषध फवारणी आणि धुरफवारणी हॅण्डमशीनद्वारे 11201 ठिकाणी धूरफवारणी करण्यात आली, तसेच 04 ठिकाणी गप्पी मासे सोडण्याचे कार्यक्रम राबविण्यात आले असल्याचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भिमराव जाधव यांनी नमूद केले.