सध्या १२ स्थानकांचे नियोजन
ठाणे : ‘मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल’ प्रकल्पासाठी 1389.5 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून, प्रकल्पाची एकूण लांबी 508 कि.मी. आहे. त्यात गुजरातमधील 352 कि.मी आणि महाराष्ट्रातील तब्बल 156 कि.मी.आहे.
सध्या 12 स्थानकांचे नियोजन आहे. त्यात मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलिमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आणंद/नडियाद, अहमदाबाद, साबरमती ही स्थानके आहेत.
21 ऑक्टोबर 2024 पर्यंत या प्रकल्पाची स्थिती पाहता प्रकल्पासाठी संपूर्ण 1389.5 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे, अशी माहिती ‘मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल’च्या सूत्रांकडून मिळाली.
गुजरात भागांसाठी प्रकल्प आणि ट्रॅक निविदांसाठी सर्व नागरी निविदा आणि डेपो निविदा देण्यात आल्या आहेत आणि व्हायाडक्टचे बांधकाम जोमाने सुरू आहे,असे सांगण्यात आले. पियरचे काम 338 कि.मी., व्हायाडक्ट बांधकाम 222 कि.मी., नद्यांवरील पुलाची प्रगती होत असून, 11 स्टील पुलांची उभारणीचे काम सुरु आहे. सर्व 12 बुलेट ट्रेन स्थानकांचे काम प्रगतीपथावर असल्यामुळे ध्वनी अडथळे बसविण्याचेही काम सुरू आहे आणि आतापर्यंत 42.07 कि.मी. ट्रॅक बेड बांधकामाची प्रगती झाली आहे. समुद्राखालून जाणा-या सात कि.मी. लांबीच्या 21 कि.मी. बोगद्याचे कामही सुरू झाले आहे.
‘बुलेट ट्रेन’च्या अप आणि डाऊन दोन्ही रुळांना एकाच बोगद्यात सामावून घेण्यासाठी समुद्राखालील बोगदा जमिनीपासून सुमारे 36 मीटर खाली असून 12.1 मीटर व्यास आहे. एवढ्या मोठ्या व्यासाचा समुद्राखालचा बोगदा भारतात पहिल्यांदाच तयार केला जात आहे.
एकूण 21 किलोमीटरपैकी 16 कि.मी. बोगदा टनेल बोरिंग मशिन (टीबीएम) आणि उर्वरित पाच कि.मी. ‘न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग’ पद्धतीने (एनएटीएम) बांधण्याचे नियोजन आहे. जमिनीची परिस्थिती आणि त्याची विश्वासार्हता लक्षात घेऊन 13.6 मीटर ‘कटर हेड’व्यासाचे स्लरी प्रकारचे टीबीएम खरेदी केले जात आहेत. टीबीएम कमी करण्यासाठी आणि पुनर्प्राप्तीसाठी तीन शाफ्टचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे आणि 394 मीटर लांबीचा अतिरिक्त ‘इंटरमीडिएट टनेल’ (एडीआयटी) पूर्ण झाला आहे आणि या कामांना गती देण्यासाठी ‘एनएटीएम’च्या माध्यमातून टनेल बोअरिंग एकाचवेळी तीन फे-यांवर हात फिरवण्यात आले आहेत.