हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यासाठी १३ हजार अर्ज

ठाणे : यापुढे आता सर्वच वाहनांवर ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’ लावणे राज्य शासनाने बंधनकारक केल्यानंतर १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनासाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यास सुरुवात केली आहे.

ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने दिलेल्या संकेतस्थळावर तब्बल १३ हजार वाहनांनी नवीन नंबर प्लेट लावण्यासाठी ऑनलाईन’ अर्ज केले आहेत.
रस्त्यावर धावणारे वाहन नेमके कोणाचे, बनावट नंबर प्लेट लावून होणारे गुन्हे, अशा विविध कारणांमुळे वाहनाच्या नंबरप्लेटवरून वाहनाची खरी ओळख पटविण्यासाठी मोठा अडथळा ठरत आहे. यावर नामी उपाय म्हणून राज्य सरकारने सर्व वाहनांना “हाय सिक्युरिटी नंबर प्लेट” बसविणे अनिवार्य केले आहे.