ठाणे: ठाणे जिल्ह्यात बिगर आदिवासी क्षेत्रात महाराष्ट्र स्टेट को. ऑप. मार्केटिग फेडरेशन व आदिवासी विकास क्षेत्रामध्ये आदिवासी विकास महामंडळ या दोन यंत्रणांमार्फत धान खरेदी प्रक्रिया राबविण्यात येणार असून जिल्ह्यात या खरीप पणन हंगामाकरिता धान (भात) खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्रे सुरु करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत देण्यात आल्या आहेत.
या यंत्रणांमार्फत जिल्ह्यात 13 ठिकाणी खरेदी केंद्रे सुरू करण्यात येणार असून यामध्ये शहापूर तालुक्यातील दोन नव्या केंद्रांचा समावेश आहे.
किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकडील धान पणन हंगाम 2024-25 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान/भरडधान्य खरेदी करण्यासंदर्भात शासनाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत.
किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकडील धान पणन हंगाम 2024-25 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान/भरडधान्य खरेदी करण्यासाठी शासनाने धान व भरडधान्य खरेदी करण्यासाठी बिगर आदिवासी क्षेत्रात महाराष्ट्र स्टेट को. ऑप. मार्केटिंग फेडरेशन, मुंबई व आदिवासी क्षेत्रामध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, नाशिक या दोन अभिकर्ता संस्थांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार या संस्थांचे ठाणे जिल्ह्यामध्ये जिल्हा मार्केटिंग अधिकारी, ठाणे आणि प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, प्रादेशिक कार्यालय जव्हार, जि.पालघर हे कार्यरत आहेत.
आधारभूत किंमती सर्व साधारण गुणवत्ता व दर्जा पुढीलप्रमाणे:-
पीक:- धान / भात – साधारण (एफ. ए. क्यू.), आधारभूत किंमत 2300 रुपये, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष द्यावयाचा दर 2300 रुपये, “अ” दर्जा-आधारभूत किंमत 2320 रुपये शेतकऱ्यांना प्रत्यक्ष द्यावयाचा दर 2320 रुपये, भरडधान्य-ज्वारी (संकरित)-आधारभूत किंमत 3371 रुपये, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष द्यावयाचा दर 3371 रुपये, ज्वारी (मालदांडी)-आधारभूत किंमत 3421 रुपये, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष द्यावयाचा दर 3421 रुपये, बाजरी-आधारभूत किंमत 2625 रुपये, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष द्यावयाचा दर 2625 रुपये, मका:आधारभूत किंमत 2225 रुपये, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष द्यावयाचा दर 2225 रुपये रागी-आधारभूत किंमत 4290 रुपये शेतकऱ्यांना प्रत्यक्ष द्यावयाचा दर 4290 रुपये
खरिप पणन हंगाम हा 14 ऑक्टोबर 2024 ते 31 जानेवारी 2025 या कालावधीत राहील. तसेच रब्बी पणन हंगाम (रब्बी/उन्हाळी) केंद्र शासनाकडून प्राप्त सूचनानुसार राहील.