ठाणे कल्याणसह मरेच्या स्थानकांवर १३ स्तनपान कक्ष

ठाणे : स्तनपान करणा-या महिलांसाठी त्यांच्या प्रवासाच्या दरम्यान सुरक्षित आणि आरामदायक क्षेत्र निर्माण करण्यासाठी, मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दादर येथे 3, लोकमान्य टिळक टर्मिनस येथेही 3, ठाणे येथे 2, कल्याण, पनवेल आणि लोणावळा येथे 2 असे 13 कक्ष (पॉड्स) बसविण्याचा प्रकल्प सुरू केला आहे.

हा प्रकल्प नवीन आणि नाविन्यपूर्ण भाडे व्यतिरिक्त (नॉन फेअर) ‘रेव्हेन्यू आयडियाज स्कीम (एनआयएनएफआरआयएस ) अंतर्गत करण्यात आला आहे आणि हे कंत्राट ‘मे. बुलस आय मीडिया प्रायव्हेट लिमिटेड’ला देण्यात आले आहे.

27 डिसेंबर 2022 च्या स्वीकृती पत्र (एलओए ) अंतर्गत रू ६० हजार रुपये प्रति नर्सिंग पॉड आणि 1 + 1 वर्षांचा करार कालावधी असणार आहे.

नर्सिंग पॉड्स ही उपरोक्त स्थानकांवर प्रवासी सुविधा आहे. प्रवास आणि गाडी (ट्रेन) बदल करण्याच्या दरम्यान प्रतिक्षा कालावधीत बाळांच्या आहारासाठी सुरक्षित, मोफत, स्वच्छतापूर्ण जागा प्रदान करणार आहे. नर्सिंग पॉड्सचा वापर विनामूल्य असेल तसेच नर्सिंग पॉड्समध्ये प्रदान केलेल्या ‘डायपर चेंजिंग’ स्टेशनची सेवा/वापरदेखील विनामूल्य असेल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या प्रवक्त्यांनी दिली.