शहरात आज नवीन १२ रुग्णांची नोंद

ठाणे – शहरातील कोरोना रुग्णांचा आलेख खाली आला आहे. आज १२ नवीन रुग्णांची भर पडली असून १४ जण रोग मुक्त झाले आहेत. महापालिकेच्या पार्किंग प्लाझा येथे अवघे पाच रूग्ण उपचार घेत आहेत.

महापालिका क्षेत्रात सर्वाधिक आठ रूग्ण माजीवडा मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात सापडले आहेत तर दोन जण वर्तकनगर प्रभाग समिती आणि प्रत्येकी एक रूग्ण लोकमान्य सावरकर नगर आणि उथळसर प्रभाग समिती परिसरात मिळाले आहेत. सर्वात कमी शुन्य रुग्णांची नोंद नौपाडा कोपरी, वागळे, कळवा, मुंब्रा आणि दिवा प्रभाग समिती भागात झाली आहे.

विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रूग्णांपैकी १४ रूग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ८१ हजार ३५८ जण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर रुग्णालयात आठ आणि घरी ८५ अशा एकूण ९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महापालिका प्रशासनाने काल शहरातील ६९७ नागरिकांची चाचणी केली होती. त्यामध्ये १२ जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले असून आत्तापर्यंत २३ लाख ८९ हजार ४५८ ठाणेकरांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये एक लाख ८३ हजार ५७८ जण बाधित मिळाले आहेत.