जिल्ह्यात कोरोनाचे नवीन १२ रुग्ण

ठाणे : शहरातील नवीन कोरोना रूग्णवाढ मंदावली असून आज नवीन दोन रूग्ण सापडले आहेत तर जिल्ह्यात १२ रुग्णांची भर पडली आहे.

जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रातील रूग्णवाढ कमी होत चालली आहे. नवी मुंबई येथे सर्वाधिक आठ रूग्ण वाढले आहेत. दोन जण ठाणे महापालिका परिसरात, एक रूग्ण कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीमध्ये आणि एक जण ठाणे ग्रामिण भागात मिळाला आहे. जिल्ह्यातील इतर महापालिका आणि नगरपालिका परिसरात रूग्णवाढ झाली नाही.

जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत आणि घरी ६७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत सात लाख ३६०१२जण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत सात लाख ४७,३०४जण बाधित सापडले आहेत तर ११,९६७ रूग्ण दगावले आहेत.