ठाणे : शहरातील कोरोना रूग्णवाढ रोडावली असून आज ३७ नवीन रुग्णांची भर पडली तर जिल्ह्यात ११६ रूग्ण सापडले आहेत. सुदैवाने आज एकही रूग्ण दगावला नाही.
जिल्ह्यातील नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ४९, कल्याण-डोंबिवली येथे नऊ, उल्हासनगर महापालिका हद्दीत दोन आणि मीरा-भाईंदर महापालिका परिसरात १२ रुग्णांची नोंद झाली आहे. बदलापूर येथे दोन आणि ठाणे ग्रामीण भागात पाच रूग्ण नोंदवले गेले आहेत.
जिल्ह्यातील रुग्णालयात आणि घरी ८०९जणांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत सात लाख ३३,८९३जण बाधित सापडले आहेत तर सात लाख २१,७९४रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. एकही रूग्ण दगावला नसून आत्तापर्यंत ११,९२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.