ठाण्यात नवीन करोनाचे ११ रुग्ण

ठाणे: शहरातील कोरोना रुगणांची पुन्हा एकदा किंचित वाढ झाली आहे. आज ११ नवीन रुग्णांची भर पडली आहे तर २०जण रोगमुक्त झाले आहेत. सलग सहा दिवस एकही रूग्ण रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली नाही.

विविध रुग्णालयात आणि घरी उपचार घेत असलेल्या रूग्णांपैकी २०जण रोगमुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ८१,७३८ रूग्ण ठणठणीत बरे झाले आहेत तर घरी ८९जणांवर उपचार सुरू आहेत. आज एकही रूग्ण रुग्णालयात दाखल करण्यात आला नाही. आत्तापर्यंत २,१३०जण दगावले आहेत.

महापालिका प्रशासनाने काल शहरातील ३८० नागरिकांची चाचणी घेतली होती. त्यामध्ये ११जण बाधित सापडले. आत्तापर्यंत २४ लाख २०,४८२ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ८३,९५७ रूग्ण बाधित मिळाले.