शेअर खरेदीच्या नावाखाली ११ लाख रुपयांची फसवणूक

ठाणे : कासारवडवली येथील गृहिणीला अनोळखी व्यक्तीने शेअर मार्केटबाबतची माहिती देऊन व्हॉटस्अ‍ॅपच्या ग्रुपमंध्ये अ‍ॅड करून विश्वास संपादन केला. त्या महिलेने अनोळखी व्यक्तीची माहिती न घेतल्यामुळे तिची तब्बल ११ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाली आहे.

21 डिसेंबर 2023 ते 22 जानेवारी 2024 या काळात हा प्रकार घडला. घोडबंदर रोड भायंदरपाडा येथे राहणा-या फिर्यादी महिलेने (41) अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवला. त्यानंतर मोबाईलधारक व्यक्तीने इन्स्टाग्राम खात्यावर लिंक पाठवून त्यात शेअर मार्केटबाबतची माहिती दिली. त्यानंतर तिला व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपमध्ये अ‍ॅड करून ‘त्या’महिलेचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर फिर्यादी यांना वेगवेगळया कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याकरीता त्यांच्याकडून एकुण 11 लाख रुपये रक्कम ऑनलाईन घेतले आणि ते परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक केली आहे.

या प्रकाराबाबत फिर्यादींनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात मोबाईलधारक आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल पाटील हे करीत आहेत.