ठाण्यात कोरोनाचे १०५ नवीन रुग्ण

ठाणे : शहरातील नवीन कोरोना रुग्णांचा आलेख खाली आला आहे. आज १०५ रुग्णांची भर पडली तर ५२१जण रोगमुक्त झाले आहेत.

महापालिका हद्दीत सर्वात जास्त ४४ रूग्ण माजिवडे-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात वाढले आहेत. १७ वर्तकनगर, १२ उथळसर आणि १० रूग्ण लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समिती येथे सापडले आहेत. कळवा प्रभागात आठ, नौपाडा-कोपरी येथे सहा, वागळे परिसरात चार आणि सर्वात कमी एका रुग्णाची नोंद दिवा प्रभाग समिती भागात झाली आहे. तीन रुग्णांच्या घरचा पत्ता मिळू शकला नाही.

विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रूग्णांपैकी ५२१ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ८८,१४६ जण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर रुग्णालयात आणि घरी १,३९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज एकही रूग्ण दगावला नसून आत्तापर्यंत २,१३७जणांचा मृत्यू झाला आहे.

महापालिका प्रशासनाने काल शहरातील ७७७ नागरिकांची चाचणी घेतली होती. त्यामध्ये १०५जण बाधित सापडले आहेत. आत्तापर्यंत २४ लाख ६९,६४१ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ९१,६४१रूग्ण बाधित मिळाले आहेत.