ठाणे : शहरातील नवीन कोरोना रुग्ण वाढीची गती तीव्र झाली असून आज १०१ नवीन रुग्णांची भर पडली तर जिल्ह्यातील रुग्णांचा आकडा तीनशे पार झाला आहे. जिल्ह्यात आज एकाचा मृत्यू झाला आहे.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ११३ रुग्णांची भर पडली आहे तर एक जण दगावला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेमध्ये २८ रूग्ण सापडले आहेत. मीरा-भाईंदर येथे ४५ रूग्ण वाढले आहेत. भिवंडी परिसरात आठ रुग्णांची नोंद झाली आहे तर ठाणे ग्रामीण भागात १३ आणि बदलापूरमध्ये सहा रूग्ण नोंदवले गेले आहेत.
जिल्ह्यातील विविध रुग्णालयात आणि घरी एक हजार २५३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत एक लाख ३६,३४३जण बाधित सापडले आहेत तर सात लाख २३,५९३ रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत ११,९३७ रूग्ण दगावले आहेत.