शहरात नवीन १० कोरोना रुग्णांची नोंद

ठाणे – शहरातील कोरोना रूग्ण वाढीचा आलेख खाली आला आहे. आज १० रुग्णांची भर शहरात पडली असून २४ जण कोरोना मुक्त झाले आहेत. एकही रूग्ण दगावला नाही.

महापालिका क्षेत्रात सर्वाधिक पाच रूग्ण माजीवडा मानपाडा प्रभाग समिती येथे तर दोन जण वागळे प्रभाग समितीमध्ये वाढले आहेत. प्रत्येकी एक रुग्ण मुंब्रा, लोकमान्य सावरकर नगर आणि उथळसर प्रभाग समिती भागात सापडला आहे. तर सर्वात कमी शून्य रूग्ण नौपाडा कोपरी, वर्तकनगर, कळवा आणि दिवा प्रभाग समिती भागात नोंदवले गेले आहेत.

विविध रुग्णालयात आणि घरी उपचार सुरू असलेल्या रूग्णांपैकी १४ जण रोग मुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ८१ हजार ३८९ रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर रुग्णालयात आणि घरी ९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आत्तापर्यंत दोन हजार १२७ जण दगावले आहेत.
महापालिका प्रशासनाने काल शहरातील ६४१ नागरिकांची कोरोना चाचणी केली होती. त्यामध्ये १० जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. आत्तापर्यंत २३ लाख ९० हजार ९३५ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये एक लाख ८३ हजार ६०७ जण बाधित मिळाले आहेत.