ठाणे : गेल्या काही महिन्यांपासून मध्य रेल्वेने एसी लोकल सेवा सुरु केल्यानंतर असंख्य प्रवाशांना ‘गारेगार’ प्रवासाची सवय झाल्यामुळे, या गाड्यांमध्येही प्रवासी संख्या वाढली आहे, त्यामुळे येत्या शुक्रवारपासून मध्य रेल्वेने आणखी १० एसी लोकल सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
१९ ऑगस्टपासून सध्याची नॉन-एसी सेवा बदलून आणखी 10 एसी सेवा सुरू करणार असल्यामुळे एसी लोकल सेवेची एकूण संख्या दररोज 66 होणार आहे. तथापि, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील उपनगरीय सेवांची एकूण संख्या केवळ 1810 राहणार आहे. या 10 सेवांपैकी एक सेवा सकाळच्या गर्दीच्या वेळांमध्ये आणि एक संध्याकाळी गर्दीच्या वेळांमध्ये असतील. रविवार आणि नामांकित सुट्टीच्या दिवशी या एसी लोकल धावणार नाहीत. या सेवा सध्याच्या वेळापत्रकानुसार रविवार/नामांकित सुटीच्या दिवशी नॉन-एसी म्हणून चालवण्यात येतील.
सीएसएमटी जलद लोकल ठाण्याहून सकाळी ८. २० वाजता, बदलापूर जलद लोकल सीएसएमटीहून सकाळी ९.०९ वाजता., बदलापूरहून सकाळी १०. ४२ वा . सुटणारी सीएसएमटी जलद लोकल , कल्याण जलद लोकल सीएसएमटीवरून दुपारी १२.२५ वाजता., कल्याणहून दुपारी १.३६ वाजता सुटणारी सीएसएमटी जलद लोकल., ठाणे स्लो लोकल सीएसएमटीहून दु. ३.०२ वाजता, सीएसएमटी धिमी लोकल ठाण्याहून सायंकाळी ४.१२ वाजता, बदलापूर जलद लोकल सीएसएमटीहून सायंकाळी ५.२२ वा., आणि बदलापूरहून सायंकाळी ६. ५५ वा. सुटणारी आणि ठाणे फास्ट लोकल सीएसएमटीवरून रात्री ८.३० वा. सोडण्यात येणार आहे.