ठाणे: शहरातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. आज ३४नवीन रुग्णांची भर पडली आहे तर अवघे २६जण रोगमुक्त झाले आहेत. सुदैवाने आज एकही रूग्ण दगावला नाही.
आत्तापर्यंत एक लाख ३९ हजार ४४८जणांनी कोरोनावर मात केली आहे तर रुग्णालयात आणि घरी ३२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज एकही रूग्ण दगावला नसून आत्तापर्यंत दोन हजार १०८जणांचा मृत्यू झाला आहे.
महापालिका प्रशासनाने काल शहरातील एक हजार ८१९ नागरिकांची चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये ३४जण बाधित मिळाले आहेत. आत्तापर्यंत २१ लाख १५ हजार ४२५ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ४१ हजार ८८१जण बाधित सापडले आहेत.