जिल्हा

नोकरीचे आमिष दाखवून तरुणांना लाखोंचा गंडा

नोकरीचे आमिष दाखवून तरुणांना लाखोंचा गंडा
नोकरीचे आमिष दाखवून तरुणांना लाखोंचा गंडा फोटो: ठाणे वैभव
भिवंडी पोलिसांकडून तिघांना अटक ठाणे : वन आणि महसूल विभागात नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या त्रिकुटाला भिवंडी गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या टोळीने देशातील बेरोजगार तरुणांना मोठ्या प्रमाणावर फसवले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. श्याम खतकर (५५), जुगलकिशोर लोडया (३९) आणि रवींद्र शंखुवा (५२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. काल्हेर येथील दर्शन पाटील (२८) या बेरोजगार तरुणाने भिवंडी येथील नारपोली पोलिस ठाण्यात वन आणि महसूल विभागात नोकरीचे आमिष दाखवून ७० लाखांची फसवणूक केल्याची तक्रार केली होती. या भामट्यांनी फिर्यादी दर्शन पाटील यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांची बनावट सही, राजमुद्रा आणि राज्य सरकारचे बनावट शिक्के असलेले नोकरीचे बनावट नियुक्ती पत्र देखिल दिले होते. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन या गुन्ह्याचा समांतर तपास भिवंडी गुन्हे शाखा करत होती. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या त्रिकुटाला अटक करून त्यांच्याकडून बनावट शिक्के, नियुक्ती पत्रे जप्त केली आहेत. या त्रिकुटाच्या विरोधात आणखी आठ जणांनी फसवणूक झाल्याची तक्रार दिली असून या त्रिकुटाच्या विरोधात यापूर्वी देखिल विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या त्रिकुटाने रेल्वेमध्ये नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून अनेक बेरोजगार तरुणांना गंडा घातला. यांच्या इतर साथीदारांचा पोलिस शोध घेत असून या टोळीमध्ये मंत्रालयातील काही कर्मचारी सहभागी असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत गुन्हे विभागाचे पोलिस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी दिली.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475