जिल्हा

सिव्हिल रुग्णालयात लिफ्ट बंद पडल्याने सातजण अडकले

सिव्हिल रुग्णालयात लिफ्ट बंद पडल्याने सातजण अडकले
सिव्हिल रुग्णालयात लिफ्ट बंद पडल्याने सातजण अडकले फोटो: ठाणे वैभव
बाळ-बाळंतीणीसह तीन महिला रुग्णांचा समावेश ठाणे: विविध कारणांनी प्रकाशझोतात येणाऱ्या सिव्हिल रुग्णालयाच्या इमारतीतील लिफ्टमध्ये आज दुपारी अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने एका नवजात बालकासह त्याची आई आणि चार महिला असे सातजण अडकल्याची घटना घडल्याने एकच धावपळ उडाली. जिल्हा सामान्य रुग्णालय वागळे भागातील तात्पुरत्या इमारतीमध्ये असून दोन मजल्याच्या इमारतीमध्ये अतिदक्षता विभाग, स्त्रीरोग तज्ज्ञ विभाग, प्रसूती गृह आणि लहान मुलांचा कक्ष आहे. आज दुपारी ३.१५च्या सुमारास रुग्णालयातून घरी सोडण्यात आलेली एक बाळंतीण महिला तिच्या बाळाला घेऊन तसेच तपासणीकरिता आलेल्या महिला रुग्ण आणि त्यांचे तीन नातेवाईक असे सहा ते सात जण लिफ्टने खाली येत होते. मात्र दुसऱ्या आणि पहिल्या मजल्यादरम्यान लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने लिफ्ट बंद पडली होती, त्यामुळे लिफ्टमधील रुग्ण आणि नातेवाईकांनी लिफ्टमधून बाहेर पडण्यासाठी आरडाओरड सुरु केली. त्यांचा आवाज ऐकून रुग्णालयातील कर्मचारी, सुरक्षारक्षक तसेच रुग्णांच्या नातेवाईकांनी पहिल्या आणि दुसऱ्या मजल्याच्या दरम्यान लिफ्टचा दरवाजा उघडून या सर्वांची सुखरूप सुटका केली. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. लिफ्टमध्ये नागरिक अडकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर ही घटना समोर आली. घटनेची अधिकृत नोंद करण्यात आलेली नसली तरी ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड नेमका कशामुळे झाला, याची माहिती घेण्यात येत असून रुग्णालयातील लिफ्टच्या देखभाल-दुरुस्तीचा प्रश्नही यानिमित्ताने चर्चेत आला आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475