GENERAL

कु लवधू फे म पूर्वा गोखले सध्या काय करते ?

कु लवधू फे म पूर्वा गोखले सध्या काय करते ?
कु लवधू फे म पूर्वा गोखले सध्या काय करते ? फोटो: ठाणे वैभव

करिअरची सुरुवात केव्हा झाली? - माझ्या करिअरची सुरुवात २००० साली अल्फा मराठीवरील रिमझिम मालिकेतून झाली. मी तेव्हा २३ वर्षांची होते. त्यावेळी माझी सिनेसृष्टीशी पहिल्यांदा ओळख व्हायला सुरुवात झाली. मोठेपणी अभिनेत्री होऊन सिनेसृष्टीत काम करायचे असे लहानपणापासूनचे स्वप्न होते का? - खरंतर मी असे काहीच ठरवले नव्हते. मी महाविद्यालयात असताना सीएचे शिक्षण घेत होते. त्याचवेळी रिमझिमचे निर्माते चंद्रशेखर गोखले व उमा गोखले यांनी मला सहजच मालिकेतील रोलसाठी विचारले. त्यावेळी डेलीसोप नसल्याने मला अभ्यास सांभाळून काम करता येऊ शकत होते. त्यामुळे या भूमिकेसाठी मी तयार झाले. ती माझी पहिलीच भूमिका होती. तुम्ही साकारलेली तुमची आवडती भूमिका कोणती? - मी एकाचवेळी फार भूमिका स्वीकारत नाही. ठराविक भूमिकाच करत असल्याने मी साकारलेल्या सगळ्याच भूमिका माझ्या लाडक्या आहेत. तरीही सांगायचं झालंच तर कुलवधू, बरसाते, तुझसे है राबता या मालिकेतील मी साकारलेल्या भूमिका माझ्या आवडीच्या आहेत. या क्षेत्रात काम करताना लक्षात राहिलेली चाहत्यांची प्रतिक्रिया किंवा फॅन मूमेंट. - प्रत्येकवेळी प्रेक्षक येऊन चांगल्या कामाचे कौतुक करतच असतात. मात्र स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत सईबाई राणीसाहेबांची भूमिका अजूनही लोकांच्या लक्षात आहे. एकाच भागापुरते हे काम होते परंतु तरीही प्रेक्षकांना ते इतके भावले की मी कुठेही दिसले तरी मला नमस्कार करायला धावून यायचे. मी फक्त सईबाई राणीसाहेबांची भूमिका साकारली आहे हे मला सांगायला लागायचे. अजूनही अनेकजण या भूमिकेबद्दल येऊन बोलतात व कौतुक करतात. हिंदी मालिकांमधून काम करताना कधी भाषेमुळे अडथळे आले का? त्यावर कशी मात केली? - मुंबईत राहत असल्याने हिंदी भाषा बऱ्यापैकी अंगवळणी पडलेली असते. परंतु मातृभाषा मराठी असल्याने हिंदी बोलताना कधीकधी मराठी उच्चार (ॲक्सेंट) येतात. मात्र सरावाने आणि सहकलाकार तसेच दिग्दर्शकांना विचारल्यास तेही सोपे होऊन जाते. डेलीसोप करत असताना जेव्हा तुम्ही रोज तीच भाषा बोलत असता तेव्हा ती भाषा आपल्या अंगवळणी पडतेच.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475